कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष

0

बंगळुरु :- कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर सुरुवात झाली. बहुमतासाठी आवश्यक 112 जागांपेक्षा जास्त जागांवर भाजपने झेंडा फडकवला आहे. सुरुवातीला जेडीएसला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्रिशंकु स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. जेव्हा सर्व मतदारसंघाचे कल स्पष्ट झाले तेव्हा भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपाने शंभरहून अधिक मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 75 मतदारसंघात पुढे आहे. बहुमतासाठी 112 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपा बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. याशिवाय जेडीएसनं 38 मतदारसंघात मुसंडी मारली आहे.