आता कन्नडिगांच्या मराठी पट्ट्यात तीन रणरागिणी!

0

बंगळुरू । कर्नाटक विधानसभेच्या रणधुमाळीत मराठी रणरागिणी उतरल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. मराठी भाषिकांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लढतींकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. याच ठिकाणी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातून तीन मराठी भाषिक रणरागिणींनी शड्डू ठोकले आहे. वेगवेगळ्या तीन मतदारसंघांतून त्या आपले भविष्य अजमावणार आहेत. तीनही उमेदवार तगड्या असल्याचा बेळगावकरांचा कयास आहे.

निपाणीच्या बिग फाइटमध्ये शशिकला जोले
बुधवारी मराठीबहुल उमेदवारांच्या पट्ट्यात निपाणीची लढत ‘बिग फाइट’ मानली जाते. भाजप आमदार शशिकला जोले या निपाणी मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. जोले या जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांचे तगडे आव्हान असेल.

खानापुरातून अंजली निंबाळकर तर बेळगावात लक्ष्मी
उत्तर कन्नड जिल्ह्यात खानापूर मतदारसंघाचे क्षेत्र आहे. आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी अंजली निंबाळकर या तेथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निपाणीप्रमाणे खानापूरची लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने अरविंद पाटील यांना खानापूरमधून उमेदवारी घोषित केली आहे. बेळगावातून लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेस नेत्या उमेदवार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार संजय पाटील हे विद्यमान आमदार आहेत.

तिघीही तगड्या
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार शशिकला जोले यांच्या पारड्यात 81,860 मते पडली होती, तर आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी अंजली यांचे पारडेही जड मानले जाते.