बंगळुरू : कर्नाटकातला सत्तासंघर्ष आणि बहुमताचे कोडे काही सुटण्याची चिन्हे नाहीत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दुसरे स्मरण पत्र पाठवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री कुमारस्वामींनी राज्यपालांच्या या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी पक्षाच्या व्हिप जारी करण्याच्या संवैधानिक अधिकाराचाही उल्लेख केलाय. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ निश्चित करणेही चुकीचे असल्यासि कुमारस्वामींनी म्हटले आहे.
कुमारस्वामींनी बहुमत गमावल्याचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या पत्रात केला आहे. सुरुवातीला दुपारी दीडपर्यंत आणि नंतर ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याबाबल राज्यपालांनी कुमारस्वामींना पत्र पाठवले होते. मात्र विश्वास ठरावावारील चर्चा पूर्ण झाल्याशिवाय मतदान घेणार नाही, असे सांगत विधानसभा अध्यक्षांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यापालांनी पत्र पाठवले आहे. या पत्राचा मुख्यमंत्री कुमारस्वामींनी ‘लव्ह लेटर’ म्हणून उल्लेख केला आहे.