बंगळूर- कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी गाजत आहे. प्रस्तापित कॉंग्रेस व भाजपात काट्याची लढत आहे. दरम्यान कर्नाटकातल्या लोकांना हे समजले आहे की राज्यातील भ्रष्टाचार, व्याधी आणि गैरव्यवहारातून मुक्त होण्यासाठी भाजप हा एकमेव उपाय आहे. कर्नाटकमध्ये शांती, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी भाजप सरकार आवश्यक आहे. कर्नाटकात भाजप सरकार आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन म्हणून काम करणार आहे असे ट्वीट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
People of Karnataka have understood that BJP is the only solution for getting rid of corruption, disorder & misgovernance in the state. The new Govt, under PM @NarendraModi, will act as a double engine to bring peace, progress & prosperity in Karnataka. #NaavuModiJothe
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 3, 2018