श्रीनगर :- काश्मिरमध्ये जे लोक अशांतता पसरवण्याचा प्रयत्नात करीत आहे, त्यांना कधीच आझादी मिळणार नाही व त्यांची मागणी कधीच पूर्ण होणार नाही, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यांनी दिला आहे. तुम्ही लष्कराशी लढू शकत नाही, त्यामुळे तुमची आझादीची कल्पना कधीच पूर्ण होऊ शकत नाही,असेही रावत म्हणाले.
बिपीन रावत यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, जे लोक काश्मिरमधील तरुणांना बंदूक उचलण्यास प्रोत्साहित करत आहे, त्यांनी हातात बंदूक घेतली तर आझादी मिळेल असे जे सांगतायेत ते तरुणांची दिशाभूल करत आहे, असेही त्यांनी सांगितले. आझादीकरिता हातात शस्त्र घेवून तुमचा काहीच उपयोग होणार नाही, असे बिपीन रावत म्हणाले. चकमकीत कोणाचा मूत्यू होतो तेव्हा आम्हालाही दुःखच होते, आम्हाला आनंद होत नाही. पण समोरुन कोणी लढत असेल तर पूर्ण ताकदीने लढण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही. याची जाणीव रावत यांनी करून दिली.
काश्मिरींना समजायला हवे की भारतीय लष्कर इतर देशांएवढं क्रूर नाहीये, पाकिस्तान किंवा सीरियामध्ये अशा घटनांच्यावेळी टॅंक आणि हवाई ताकद वापरली जाते. पण आम्ही नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देतो. काश्मीरच्या तरुणांमध्ये राग आहे हे मी समजू शकतो, पण दगडफेकीने काही साध्य होणार नाही , असेही रावत म्हणाले.