जम्मू- कठुआ येथे आठ वर्षीय नाबालिक मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. बलात्कार व हत्याप्रकरणी पोलीस तपास करीत असून तपासात आरोपीपैकी एक असलेले आरोपी सांझी राम याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले आहे कि १० जानेवारी रोजी मुलीचे अपहरण झाले त्यानंतर १३ जानेवारी रोजी अपहरणानंतर बलात्कार केल्याची माहिती सांझी राम याला मिळाली.
या बलात्कार प्रकरणात सांझी राम यांच्या मुलाचाही समावेश असल्याने राम यांनी या मुलीला मारण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 10 जानेवारी रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर सर्वात अगोदर सांझी राम याच्या अल्पवयीन पुतण्याने बलात्कार केला. त्यानंतर १७ जानेवारी रोजी मुलीचा शव जंगलात आढळून आला.
या प्रकरणात अल्पवयीन मुलासोवातच सांझी राम, त्याचा मुलगा विशाल आणि तर पाच जन सहभागी होते अशी माहिती दिली. मुलीला अपहरणानंतर सांझी राम पुजारी असलेल्या मंदिरात ठेवण्यात आले. हिंदू समुदायात राहणाऱ्या घुमतू जनसमुदायाला घाबरविण्यासाठी सापळा रचण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.