नवी दिल्ली – कठुआ पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल, फेसबुक व ट्विटरला नोटीस बजावला आहे. या माध्यमांच्या भारतीय उपकंपन्यांनी आपण यावर उत्तर देण्यास बांधील नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने कंपन्यांच्या मुख्यालयांना नोटीस पाठवले आहेत. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने कठुआ पीडीतेची ओळख उघड करणाऱ्या प्रत्येक माध्यम समूहावर १० लाख रुपयांचा आकारला होता.
यासोबतच बलात्कार पीडीत व्यक्तीची ओळख उघड करणाऱ्यांना सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल असे बजावले होते. कठुआ येथील ८ वर्षीय चिमुकलीचे जानेवारी महिन्यात अपहरण करून मादक औषधे देऊन सामुहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.