मुंबई-अभिनेत्री अमृता सिंग, सैफ अली खान यांची कन्या सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दरम्यान हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. धार्मिक भावना दुखविल्याचे आरोप चित्रपटावर होत आहे. भाजप नेत्याकडून लव जिहाद वाढविण्यासाठी हा चित्रपट प्रोत्साहन देत असल्याचे आरोप केले आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. दरम्यान चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमागे धार्मिक भावना दुखविण्याचे उद्देश नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप नेत्यांनी मागील आठवड्यात सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.