VIDEO….पहा केरळमधील चक्रावणारी परिस्थिती !

0

थिरुअनंतपूरम-केरळमध्ये पावसाचे थैमान मागील अनेक दिवसांपासून सुरु असून येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत जवळपास ३५७ जणांचे या पूरामध्ये प्राण गेले असून अद्यापही हजारो जण या पूरात अडकले आहे. अजूनही पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी जीवाचा अकांत करताना दिसत आहेत. नागरिकांना या परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान, पोलीस यंत्रणा, स्थानिक तरुण, सामाजिक संस्था मेहनत घेत आहे. नागरिकांसाठी सुरु असलेले बचाव कार्य पाहून थक्क व्हाल असे चित्र सध्या केरळमध्ये आहे.

एनडीआरएफची १६९ टीम काम करत आहेत. २२ हेलिकॉप्टर, नेव्हीच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

या बचावकार्यातील काही फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहे. यामध्ये बचाव करणारे लोक आपला जीव कशापद्धतीने धोक्यात घालून हे कार्य करत आहेत ते दिसत आहे. यामध्ये वयस्कर लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेकांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे. सुरक्षा जवान आपल्या प्राणाची चिंता न करता येथील नागरिकांसाठी देवदूताप्रमाणे धावून आले आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत २० हजार नागरिकांची सुटका करण्यात आली. ९०० जणांना एअर लिफ्ट करण्यात आले. या घटनेचे व्हिडियो आणि फोटो भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ, सीआरपीएफ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट केले आहेत. हे व्हिडियो आणि फोटो अक्षरश: थक्क करणारे आहेत.