थिरुअनंतपूरम-केरळमध्ये पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून कमी झाला आहे. पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून जनजीवन पुर्वपदावर येत आहे. नौदलाकडून केरळमधील बचावकार्य अदयाप सुरु आहे. लष्कराचे जवान मागील आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून केरळमधील नागरिकांना सुखरुपस्थळी पोहचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. लष्कराने केलेल्या याच मदतीसाठी केरळ सरकार मदकार्यामध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या जवानांचा सत्कार करणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनयी विजयन यांनी यासंदर्भातील माहिती देताना येत्या रविवारी हा सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले
थिरुअनंतपुरम येथे राज्यातील परिस्थितीचा आणि मदतकार्याचा आढावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. २६ ऑगस्ट रोजी थिरुअन्ंतपरम येथे एक लष्कराच्या जवानांच्या सन्मानार्थ एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी धावून आलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केरळ सरकारने याआधी पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मच्छीमारांचेही आभार मानले होते.
‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून १६ हजार ५ जणांना वाचवण्यात यश आले. ‘ऑपरेशन मदत’ जरी थांबवलं असले तरीही पूरग्रस्त लोकांना जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. विमानातून पूरग्रस्तांना अन्न आणि औषधे पुरविली जात आहेत. अशी माहिती नौदलाच्या दक्षिण विभागाने दिली.