मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ‘नॉट रिचेबल’; तडकाफडकी मुंबईला रवाना झाल्याची चर्चा

मुंबई । प्रतिनिधी 

महाराष्ट्राराजकारणातून मोठी माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) नॉट रिचेबल असल्याची माहिती पुढे आली आहे. अजित पवार (Ajit Pawar)भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे . धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबरही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. कालच ते संभाजीनगरलाही गेले होते. मात्र आता ते नॉट रिचेबल झाले आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडे इतके तडकाफडकी मुंबईला रवाना का झाले? याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या घडामोडींचे गूढही वाढत चालले आहे. धनंजय मुंडे नेमके मुंबईला गेले की दुसरीकडे गेले याबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. आज सकाळपर्यंत धनंजय मुंडे हे नेमके कुठे पोहोचले आहेत याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. रात्री त्यांच्या निकटवर्तीयांकडून मुंडे हे तिरुपतीच्या दर्शनासाठी गेल्याची ही माहिती समोर आली होती. मात्र यात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या सर्व घडामोडी पाहता येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.