‘खान्देश पापड महोत्सवाचे जळगावात धमाकेदार उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जनता सहकारी बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी लेवा बोर्डींग हॉल येथे आयोजित खान्देश पापड महोत्सवाचे शनिवार दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता धमाकेदार उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव पुढील तीन दिवस चालणार असून महोत्सवात सुमारे ५० बचत गट सहभागी झाले आहेत.

अध्यक्षस्थानी श्री अनिल भोकरे, सेवानिवृत्त महासंचालक कृषि विभाग हे उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीकांत झांबरे, बँकेचे संचालक सुशील हासवाणी, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, संध्या देशमुख, माजी संचालिका तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, माजी संचालिका सावित्री सोळुंखे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी यांचीही उपस्थिती होती.