किंग्ज इलेव्हन पंबाज संघाच्या प्रशिक्षकपदी माईक हेसन

0

नवी दिल्ली-न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांची आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंबाज संघाच्या प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. हेसन यांच्याशी संघ प्रशासनाने दोन वर्षांचा करार केला असून, हेसन ब्रॅड हॉज यांची जागा घेतील.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश मेनन यांनी हेसन यांच्या नियुक्तीला दुजोरा दिला आहे. हेसन यांच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडच्या संघाने २०१५ साली झालेल्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशासनाने हेसन यांना आपली पसंती दर्शवली आहे. पंजाबचा संघ आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकला नाही, त्यामुळे आगामी हंगामात हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.