शाळेचा गेट पडल्याने विध्यार्थ्याचा मृत्यू

0

मुंबई-मुंबई महानगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या कोपरखेरणे येथील महानगर पालिकेच्या शाळेचा गेट एका विद्यार्थ्याचा अंगावर पडल्याने यात विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. सौरभ चौधरी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहे. सकाळी ९३० वाजेची ही घटना घडली. दरम्यान शाळा बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळा वादाच्या भोवऱ्यात
मनपाने ४० कोटी रुपये खर्चून या शाळेचे बांधकाम करण्यात आले होते. एखाद्या विद्यापीठाच्या बांधकामापेक्षाही अधिक खर्च या शाळेवर करण्यात आला असल्याने ही शाळा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. तत्कालीन मनापा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यावरून अभियंत्याला निलंबित केले होते.