कृणाल पंड्याची ऐतिहासिक कामगिरी; ठरला तीन बळी घेणारा पहिला भारतीय !

0

ऑकलंड- भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज दुसरा २०-२० सामना होत आहे. पहिल्या २०-२० सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने इतिहास रचला आहे. कृणालने यावेळी कर्णधार केन विल्यमसन, कॉलिन मुर्नो आणि डॅरील मिचेल यांना बाद केले. या सामन्यात तीन बळी मिळवत कृणालने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंतच्या २०-20 सामन्यांत दोनपेक्षा जास्त बळी मिळवणारा कृणाल हा पहिला गोलंदाज ठरला आहे.