हेरगिरी प्रकरणी कुलभूषण जाधव यांचा निकाल आज

0

नवी दिल्ली: पाकीस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांचा निकाल आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार आहे. पाकिस्तान न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची कायदे विषयक टीम न्यायालयात पोचली आहे. पाकिस्तानने जाधव यांना २०१६ साली गुप्तहेर आणि दहशतवादी कारावाया या आरोपाखालि अटक करण्यात आली होती.

पाकिस्तान न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणी वेळी भारताने या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायलयात धाव घेतली होती. भारताकडून सांगण्यात आले आहे की, कुलभूषण जाधव हे व्यापारासाठी बलुचिस्तान मध्ये गेले होते. त्यांचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणानी अपहरण केले. पाकिस्तान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावणी केल्या नंतर भारताने या शिक्षेला विरोध केला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आदेश पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावा म्हणून तिथे भारताने दाद मागितली होती. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय काय निकाल देते त्या सुनावणीकडे पूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.