बंगळूर-१५ मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस मिळून भाजपशी लढत होते. आता कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमध्येच भांडण होण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संकेटमोचक डी. शिवकुमार हे नाराज आहेत. तर उपमुख्यमंत्रीपद मिळालेले परमेश्वर यांनी नमनालाच पुढे काय होणार याचे संकेत देत कुमारस्वामींना धक्का दिला आहे. कुमारस्वामी सरकारला पूर्ण पाच वर्ष पाठिंबा देण्याबाबत अजून निर्णय घेतलाला नाही असे परमेश्वर यांनी स्पष्ट केल्याने कुमारस्वामींची पुढची वाटचाल काटेरी असेल असे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत.