मुंबई : राज्याचे कामगार तसेच कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर सध्या नाराज असल्याचे समजत आहे. लातूर-उस्मानाबाद विधान परिषद मतदारसंघातून भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजी पाटील निलंगेकरांचे भाऊ अरविंद निलंगेकरांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे.
हे देखील वाचा
सुरेश धस हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी निलंगेकर उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर् ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.