वरणगांवात क्रिडापटुंसाठी क्रिंडागणाचा अभाव

अॅथलेक्टीस क्रिडापटु सरावा पासून वंचीत - नगर परिषदेने पुढाकार घेण्याची आवश्यकता

वरणगांव । प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या वरणगांव शहरावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मतांचा जोगवा मागण्यासाठी निवडणूकीच्या काळात विशेष लक्ष व महत्व दिले जाते . यानंतर मात्र, शहरातील मुलभुत सुविधा व इतर अत्यावश्यक सुविधांकडे कानाडोळा केला जातो . यामध्ये महत्वाचे म्हणजे युवा खेळाडूंना अत्यावश्यक असलेले सार्वजनिक क्रिडागंणच नसल्याने त्यांना अॅथलेक्टीस क्रिडांच्या सरावापासून वंचीत रहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे .
तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या वरणगांव शहराची ओळख आयुध निर्माणी, हतनुर धरण यामुळे चांगलीच प्रचलीत झाली असुन वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे . यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातुन शहराच्या विविध भागांमध्ये विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे . यामध्ये खुल्या भुखंडामध्ये सार्वजनिक बालउद्याने, सभागृह, वाचनालय, व्यापारी संकुले अशा कामांचा समावेश असुन शैक्षणिक क्षेत्रातही आगेकुच सुरु आहे . मात्र, सर्वाधिक महत्वाचे म्हणजे युवा खेळाडूंना विविध क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना अत्यावश्यक सरावासाठी शहरात एकही सार्वजनिक क्रिडागंणाची जागा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना क्रिडा स्पर्धां पासुन वंचीत रहावे लागत असल्याने शहरातुन आतापर्यंत केवळ एकच विद्यार्थींनीने शालेय स्तरावरून (जिल्हा – राज्य पातळीवर …. ) नाव लौकीक केले आहे . मात्र, इतर खेळाडूंना सरावासाठी सार्वजनिक क्रिडांगणच उपलब्ध नसल्याने त्यांच्या मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे . यासाठी प्रशासन व लोक प्रतिनिधींनी युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे .

केवळ मोजक्याच ठिकाणी क्रिडागंणे
तालुक्यातील भुसावळ शहरात आयुध निर्माणी व रेल्वे प्रशासनाचे सुसज्ज असे क्रिडागंणे आहेत . त्याच प्रमाणे तालुक्यात दिपनगर, व वरणगांव आयुध निर्माणीत प्रशासकीय क्रिडागंणे आहेत . हि क्रिडागंणे सर्व साधारण खेळाडुंना उपलब्ध होत नसल्याने त्यांना क्रिडा सरावा पासुन वंचीत रहावे लागत आहे .

 

केवळ मतांसाठी शहरावर डोळा
वरणगांव शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीचे रुपातंर नगरपरिषदे मध्ये झाले आहे . तेव्हा पासुन विविध निधीतुन विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे . मात्र, युवा खेळाडुंना विविध अॅथलेटिक्स क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अत्यावश्यक सरावासाठी क्रिडागंणाच्या बाबतीत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय स्तरावरून कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसुन येत नसल्याने खेळाडुंमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे . लोक प्रतिनिधींचा युवा वर्गाचा केवळ मतांसाठी वापर केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे .