जळगाव- घरभाड्याचे पैसे परस्पर पतीने सासूकडे दिल्याचा राग आल्याने वादातून सुनेने सासूचा वायरीच्या सहाय्याने गळा आवळल्याची घटना 12 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जुन्या जळगावातील भोईवाडा येथे घडली होती. यात अत्यवस्थ झालेल्या सासूला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पोलीस निरिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जुन्या जळगावातील भोईवाडा येथे मिनाबाई कानिशनाथ कोळी (वय 50) ह्या मुलगा लक्ष्मण व व सुन दिपाली यांच्यासह भोईवाडा परिसरात वास्तव्यास आहेत. लक्ष्मण कोळी यांनी घरभाड्याचे जमा करुन आणलेले पैसे सोमवारी सायंकाळी आई मिनाबाई हिच्याकडे दिले. यावरुन मिनाबाई व सुन दिपाली यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत होवून सुन दिपाली हिने सासू मिनाबाई हिचा वायरीच्या सहाय्याने गळा आवळला. यात अत्यवस्थ झाल्याने मिनाबाई यांना मुलगा लक्ष्मण हिच्यासह इतरांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी घटनास्थळी भेट दिली. मिनाबाई बेशुध्दावस्थेत असल्याने सोमवारी दुपारी शनिपेठ पोलिसांनी जिल्हा रुग्णालयता जावून त्यांचा जबाब नोंदविला. शेवटचे वृत्त हाती आले याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.