लालू प्रसाद यादव तुरुंगातून आल्यानंतर चेंगराचेंगरी

0

लखनऊ : मुलाच्या लग्नासाठी लालूप्रसाद यादव यांना तीन दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. त्यामुळे चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांना आता मुलाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे. डिसंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. दरम्यान, लालू पाटण्यात पोहोचताच त्यांना पाहाण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावेळीचेंगराचेंगरी झाली आणि काहीजण जखमी झालेत.

१२ मे रोजी लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचं लग्न बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय हीच्या सोबत होणार आहे. त्यासाठी लालूंची तीन दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली. दरम्यान सुटका होऊन लालू पाटण्यात पोहोचताच त्यांना पाहाण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.