मी घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम; तेज प्रतापने वडिलांची विनंती नाकारली

0

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इच्छेविरुद्ध ऐश्वर्या रायशी लग्न लावण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आता तेज प्रताप यांनी केला आहे. तेज प्रताप यादव घटस्फोट घेण्यावर ठाम आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रतापला मी जामिनावर घरी येईल तोपर्यंत थांब अशी विनंती केली. मात्र वडिलांच्या या विनंतीला तेज प्रताप यांनी अमान्य केले असून घटस्फोट घेण्यावर ठाम आहे.

तेज प्रताप यदाव ने ‘मी एक साधाभोळा माणूस आहे. इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर राजकीय फायद्यासाठी जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरु होता’ असे तेज प्रताप यादवने सांगितले आहे.

लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचे ५ महिन्यापूर्वी १२ मेंला लग्न झाले होते. दरम्यान ५ महिन्यातच दोघांमध्ये वाद झाले व त्याचा परिणाम घटस्फोट घेण्यावर झाले. तेज प्रताप यादव यांची पत्नी माजी मुख्यमंत्री दारोगा प्रसाद राय यांची नातू तर माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी आहे.