अखेरच्या २०-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव; ३-० ने न्यूझीलंडचा मालिका विजय

0

हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात झालेल्या आज अखेरच्या २०-२० सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला आहे. स्मृती मानधनाच्या ८६ धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. शेवटच्या २०-२० सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत सामना रंगला. परंतु अखेरीस भारताला अवघ्या २ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने ३-० अशा फरकाने मालिका जिंकली.

अखेरच्या सामन्यात १६२ धावांचे लक्ष भारतीय संघासमोर होते. न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिनच्या ( ७२ ) धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत भारतीय महिलांसमोर १६२ धावांचे आव्हान उभे केले आहे.