हे होतं भय्यू महाराजांच अखेरच ट्विट

0

इंदूर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:वर डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ट्विटही केले होते. त्यांच्या @bhaiyujimaharaj या ट्विटर हॅण्डलवरुन दुपारी 1 वाजून 29 मिनिटांनी शेवटचे ट्विट करण्यात आले आहे. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या भक्तांना मासिक शिवरात्रीचा अर्थ सांगत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे हे ट्विट त्यांचे अखेरचे ट्विट ठरले आहे.