नितीन गडकरींच्याहस्ते पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन

0

नागपूर: बहुचर्चित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट २४ में ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारे अभिनेता विवेक ऑबेरॉय यांच्या उपस्थितीत पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.

लोकसभा निवडणूक सुरु होती, या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय देखील गेले होते.