पालेभाज्या झाल्या स्वस्त ; पालक, मेथी १० रुपये जुडी

जळगाव – मेथी पालक ढोकळा आंबट चुका कोथिंबिरीचे भाव  मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. मेथी 30 रुपये किलो , पालक 30 रुपये किलो, भोपळा 30 रुपये किलो , कोथिंबीर 30 रुपये किलो. इतके भाव कमी झाले आहेत. यामुळे आता पालेभाज्या खायचे असतील तर नागरिक भरपूर होऊ शकतात.

पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने पालेभाज्यांचे भाव प्रचंड वाढले होते मात्र आता ते कमी झाले आहेत यामुळे नागरिकांना समाधान वाटत आहे.

 

पालेभाज्या स्वस्त होण्याची कारणे

  1. हिवाळ्यामध्ये सर्वच भाजीपाल्याची आवक चांगली असते त्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी त्याची मोठी मदत होत आहे
  2. जमिनीत पाणी साठा चांगला असल्यास सह जल साठेही भरलेले असल्याने शेतांमध्ये पीक चांगले येण्यास मदत होत आहे
  3. पालेभाज्यांचे उत्पादन चांगले होत असत आवकही चांगली झाली आहेत त्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमी होत आहेत.