चांद्रयान मिशनचे शास्त्रज्ञ सतीशसेतू माधव यांचे रविवारी व्याख्यान

जळगाव । विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी नोबेल फाउंडेशन कार्यरत आहे. नोबेल फाउंडेशनतर्फे रविवारी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे चांद्रयान तसेच मंगळयान मोहिमेवर काम करणारे अवकाशतज्ञ सतीश सेतूमाधव यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी ते इस्रो आणि अवकाशाचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी नोबेल फाउंडेशन आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डायटचे निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड, बांभोरी इंजीनियरिंग कॉलेजचे, प्राचार्य डॉ. जी. के पटनाईक जिल्हा परिषद जळगावच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर समारंभ आर्ट ऑफ लिविंगचे सभागृह शासकीय आयटीआयच्या मागे येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.