दिल्ली: आज लागलेल्या रामजन्म भूमी बाबत लागलेल्या न्यायाबाबत न्यायालयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करत आहे. सगळ्यांचे धन्यवाद करत,आभार मानले आहेत. कोर्टाच्या निर्णयाने न्याय मिळाला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्यांनी यासाठी बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान विसरता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाकडे जय, पराजय म्हणून बघितले जाऊ नये. लोकांनी संयम दाखवत आनंद साजरा करण्याचे सांगितले. भूतकाळात जे झाले ते विसरत सगळ्यांनी एकत्र येवूया असे त्यांनी स्पष्ट केले आहे.