सरकार विरोधात मराठा क्रांती मोर्चाला फायनान्स करणारे आम्हाला माहिती!

0
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी स्वतः समर्थकआहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जाव्या यासाठी योजना मंजूर केल्या आहेत. सर्वसामान्य मराठा समाज यामुळे खुश आहे मात्र सरकार विरोधात काही जणांकडून जाणीवपूर्वक नवीन  केल्या जात आहेत. या माध्यमातून नवनवीन नेते निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सरकार विरोधात  मराठा क्रांती मोर्चा काढणाऱ्यांना फायनान्स करणारे कोण ? तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषदांची बीले अदा करणारे कोण आहेत? याची माहिती सरकारकडे इंटेलिजन्स असल्याने सर्व माहिती मिळते असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
केवळ सरकारच्या विरोधात मराठा समाजाला उचकाविण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक नवनव्या गोष्टी काढायला लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाने त्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम मराठा क्रांती मोर्चा संघर्ष समितीने दिला. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.
मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तसेच मराठा समाजाबरोबर ज्या ज्या वेळी वेळी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी जो काही तोडगा निघाला त्याविषयीचे शासन निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्या निर्णयांची अमंलबजावणी अद्यापही सुरुच आहे, असे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, राज्य सरकार करत असलेल्या कामावर ९९ टक्के मराठा समाज समाधानी असल्याचे सांगत फक्त १ टक्का समाज अशा उचकाविणाऱ्यांमुळे नाराज असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याशिवाय ओबीसी समाजाला ज्या ज्या शैक्षणिक कोर्सेसमध्ये फि सवलत दिली जाते. ते सर्व कोर्सेस मराठा समाजासाठीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाड्याने जागा घेवून तेथे वसतिगृह सुरु करावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.