न्हावी प्रतिनिधी l
समता भ्रात्रू मंडळ,पिंपरी चिंचवड, पुणे यांनी लेवा पाटीदार समाजाचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्यात मुला-मुलींचे व महिलांचे खेळ आयोजित करण्यात आले होते.विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच ज्यांनी ७५ वर्ष पूर्ण केली आहे त्याचा सत्कार करण्यात आला.डॉ.एल झेड पाटील यांनी साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव कार्य केल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला.त्यावेळेस व्यासपीठावर रमेश इंगळे, अनिल परतणे, हेमंत झोपे, सुरेश फेगडे,दिगंबर महाजन, जयंत चौधरी, गिरीश पाटील,रघुनाथ फेगडे हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवी बऱ्हाटे यांनी केले.