शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 350 दिपप्रज्वलन

भुसावल l

२ जून २०२३ , ज्येष्ठ शुक्ल १३ – तिथिनुसार ३५० व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त , ३५०दिपप्रज्वलन व शिवरायांची आरती चा कार्यक्रम शिवस्मारक , भुसावळ रेल्वे स्थानकासमोर संध्या – ६ वा.उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी शिववंदना परिवार , श्री शिवप्रतीष्ठान, गौसेवा परिवार,हिंदू धर्मजागृती समिति व शिव प्रेमी तर्फे 350 दिपप्रज्वलन व आरती करण्यात येऊन वंदन करण्यात आले .

यशस्वीतेसाठी श्री शिवप्रतिष्ठान, गौसेवा परिवार, हिंदू धर्मजागृती समिती व शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.