नवी दिल्ली l
लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेले एक ट्वीट आढळले असून हे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोसह शेअर करण्यात आले आहे यात केजरीवाल हे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसह दिसत होते.कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे या ट्वीटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर येत्या काळात सरकारने न्याय न दिल्यास ते देश सोडण्याचा विचार करतील असे देखील त्यात म्हटले आहे या ट्वीटसंदर्भात लाइटहाऊस जर्नालिज्मने केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
आम्ही गूगल किवर्ड सर्च करून यासंदर्भातील मीडिया रिपोर्ट्स शोधण्याचा प्रयत्न केला.अरविंद केजरीवाल यांचे कोणत्या कार्यक्रमातील हे विधान आहे का हे सुद्धा आम्ही तपासून पाहिले पण आम्हाला अशी कुठलीच बातमी सापडली नाही ज्यात अरविंद केजरीवाल कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राजीनामा देतील असे सांगण्यात आले होते.कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतरला भेट दिली होती ज्याविषयी अनेक बातम्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या आहेत पण कोणत्याही बातमीत अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख नाही.