LIVE अर्थसंकल्प: पहा संपूर्ण अर्थसंकल्प

0

नवी दिल्ली:मोदी सरकार 2 च्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यातील ठळक मुद्द्यांचा आढावा

https://www.youtube.com/watch?v=pZoilXWHKUk

*गेल्या वर्षभरात एनपीएमध्ये 1 लाख कोटी रुपयांची घट
*राष्ट्रीय बँकांना 70 हजार कोटींची मदत
*2019-20 मध्ये 4 नवे दूतवास सुरू करणार
*तरुणांना महात्मा गांधींची मूल्यं समजावीत यासाठी गांधीपिडीया तयार करणार
*अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही
*35 कोटी एलईडी बल्बचे वाटप केले जाणार आहे, त्यातून 18,341 कोटींच्या विजेची बचत होईल
*स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली याद्वारे तरूणांना मार्गदर्शन दिले जाणार आहे.
*रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार
*सर्वांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी जल शक्ती मंत्रालयाची स्थापना
*खेलो भारत योजनेचा विस्तार करणार; राष्ट्रीय क्रीडा शिक्षण बोर्डाची स्थापना करणार
*स्वच्छ भारत योजनेमुळे 5.6 लाख गावं हागणदारीमुक्त
*2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार
*स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार
*2 ऑक्टोबर 2014 पासून 9.6 कोटी शौचालयांची निर्मिती