अयोध्या: ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. मुख्य भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. १२ वाजून ४४ मिनिट ८ सेकंद ते १२ वाजून ४४ मिनिट ३२ सेकंद हा मुहूर्त आहे. आयोध्यानगरीत भक्तीमय वातावरणात मंत्रोच्चाराच्या गजरात हा सोहळा सुरु आहे.
यावेळी मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम जन्मभूमी आंदोलनातील महत्त्वाची भूमिका राहिलेली स्व.अशोक सिंघल यांचे नातू सलील सिंघल आदी उपस्थित आहेत.