LIVE…पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी

0

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी ४४ हजार ५०० मतांनी विजय मिळवला आहे. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत केले. आज सकाळी पहिल्या राऊंडपासूनच भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. अखेर त्यांनी विजय खेचून आणला आहे. शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनीही भाजपला काँटे की टक्कर दिली. शिवसेनेने अडीच लाखांहून अधिक मते मिळवत भाजपला काय द्यायचा तो संदेश दिला आहे. बहुजन विकास आघाडी (बाविआ) ने सुद्धा चांगली मते मिळविले आहे. मात्र, त्यांना तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विजयाचे सेलिब्रेशन नाही

भाजपचे ज्येष्ठ नेते व कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने भाजपने पालघर विजयाचे सेलिब्रेशन करणार नाही अशी माहिती भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

माझ्या कामांचा हा फळ

मी राज्यमंत्री असतांना जनतेसाठी केलेल्या कामगिरीची पावती मला जनतेनी दिली. माझ्या कामांचा हा फळ आहे. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने हा माझा विजय झाला आहे असे भाजपचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांनी विजयानंतर प्रतिक्रीया दिली आहे.

आजपासून २०१९ च्या निवडणुकीची तयारी 

पालघरमध्ये आजही वनगा म्हणजे कमळ  अशी समाज होती. त्यामुळे अनेकांनी भाजपला मतदान दिले. भाजपने आमच्या परिवारावर अन्याय केला आहे. भाजपने साम,दाम,दंड,भेद चा वापर करून हा विजय मिळविला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता याबाबत विचार करेल. मतदान यंत्रात भाजपच्या दबावाखाली छेडछाड करण्यात आली. एका रात्रीत  ७ ते ८ टक्के  मतदानाची टक्केवारी वाढली. आजपासून २०१९ ची तयारी सुरु केली आहे. माझ्या वडिलांचा कार्य मला पुढे न्यायचे आहे अशी प्रतिक्रिया पराभवानंतर श्रीनिवास वनगा यांनी दिली आहे.