मुंबई-आज भारत वि.वेस्ट इंडीज संघात चौथा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचूक ठरला आहे. भारताने वेस्ट इंडीज संघासमोर धावांचा डोंगर उभारले आहे. भारताने ५० षटकात ३७७ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीज संघाला ३७८ धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे.
आजच्या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा, अंबाती रायडू यांनी शतकी खेळी साकारली. रोहितने १६२ तर रायडूने १०० धावा केल्या. त्याबळावर भारताने धावांचा डोंगर उभारला आहे.