LIVE मोदी: नभुतो नभविष्यती क्षणाचा अजूनही विश्वास नाही

0

अयोध्या: अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन झाले. १९९२ नंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमीवर दाखल झाले आहे. राम मंदिर झाल्याशिवाय अयोध्येत येणार नाही ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आज ते पूर्ण झाले आहे. तब्बल २८ वर्षानंतर ते राम जन्मभूमीत आले आहेत. भूमिपूजन सोहळ्यात मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यावेळी मोदींनी आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत राममय झाले आहे. शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली असल्याने ऊर्जामय वातावरण देशात आहे. राम मंदिर होणार नाही असेच समज आजपर्यंत होते. मात्र आज राम मंदिराचे भूमिपूजन झाले असून यावर अद्यापही काहींना विश्वास बसत नाही असे प्रतिपादन मोदींनी केले.

प्रभू श्रीरामासारखा शासक आजपर्यंत भूतलावर जन्माला आलेला नाही. संपूर्ण जगात प्रभू श्रीरामाची महिमा गायली जाती.

श्रीरामाच्या जयघोषाने त्यांनी भाषणाला सुरुवात केली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता आले याचे मला अभिमान आहे. कोट्यावधी भारतवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.

राम मंदिराच्या रूपाने पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली आणि संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा साकार झाली आहे. हा क्षण ज्या नरेंद्र मोदी या महापुरुषामुळे आला असे गौरोद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले. राम मंदिर होणार नाही असेच समज झाले होते. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे. मोदींमुळे भारतवासीयांची ही ऐतिहासिक इच्छा पूर्ण झाली आहे.