लाईव्ह.मी ने १ कोटी अॅप डाउनलोडचा टप्पा पार केला

0

मुंबई : भारताचा पहिला लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मंच लाईव्ह.मी अॅपने (Live.me) ने १ कोटी अॅप डाउनलोडचा टप्पा पार केला आहे. भारतातील २५ ते ३४ वयोगटातील युवा पिढीकडून या अॅपला भरघोस प्रतिसाद मिळाला असून केवळ वर्षभरात या अॅपने १,३६,२१,५४६ डाऊनलोड्सचा टप्पा गाठला आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग एंटरटेंमेंट आणि एंगेजमेंट सेग्मेंटमधील एक अनन्य ऑफरिंग लाईव्ह.मी क्विजबिज, चीझ सारख्या विविध ऑफरिंगसह आणि मोठ्या प्रमाणात प्रतिभावान असलेल्या कलावंत आणि सामाजिक प्रभाव असलेल्या लोकांबरोबर थेट संवाद साधून देशभरातील वापरकर्त्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हे अॅप मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांसोबतच जयपूर, सुरतसारख्या टिअर २ शहरांमधील युवावर्गामध्ये देखील विशेष प्रसिद्ध आहे.

लाईव्ह.मी ५०हून अधिक प्रसिद्ध कलाकार आणि सामाजिक प्रभावकांशी संबंधित आहे, ज्यात अभिनेता गौरव गेरा, साहिल खट्टर इत्यादी प्रमुख नामावलींचा समावेश आहे. हे वस्ताद मम खान सारख्या प्रसिद्ध स्वतंत्र कलाकार आणि परफॉर्मरसोबत लाईव मिट-अँड-ग्रीट सत्रांचे आयोजन देखील करतात. या मंचाची सर्वात लोकप्रिय ऑफर लाईव्ह परस्पर संवादी गेम शो क्विझबिझ आहे जो वापरकर्त्यांना प्रश्नांच्या एका मालिकेची उत्तरे देवून झटपट रोख रक्कम जिकंण्याची संधी देतो.