मुंबई| सुमारे 20 कार्यकर्त्याना शेतकरी दाखवून 6 राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी देण्याच्या आरोपाखाली राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते असलेल्या भाऊसाहेब फुंडकर यांची एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या कृषीमंत्रीपदावर वर्णी लावण्यात आली. मात्र तेव्हाच ते बुलढाण्याच्या राजकारणात जास्त सक्रीय असल्याचे दिसुन आले होते. याच पार्श्वभूमीवर आता देखील खामगाव अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या संचालक पद त्यांच्या गळ्याभोवती फास ठरत असल्याचे दिसून येत आहे.
2008 साली तत्कालीन सरकारने केलेल्या कर्जमाफीत बोगस शेतकर्यांना या बँकेने लाभ दिल्याचा आरोप संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे, या संदर्भात जनहीत याचीका न्यायालयात दाखल झाली असुन फुंडकर यांच्या सह संचालक मंडळावर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. खोटे सातबारे व कागद पत्र तयार करुन जवळच्या व्यक्तीना आणि कार्यकर्त्याना कर्ज दिल्याचा आरोप संचालक मंडळावर आहे. एकुण 3 टपप्यात ही कर्जमाफी देण्यात आली होती. 6 कोटीच्या आसपास असलेली ही कर्जमाफी सहदेव बेलोकर आणि इतर 20 जणांना शेतकरी असल्याचा खोटा पुरावा तयार करुन देण्यात आली होती आणि आता या संदर्भातली याचीका न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे.
दरम्यान या संदर्भात कृषीमंत्री पांडुंरग फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता हे आरोप पुर्णपणे खोटे असुन आपली बदनामी करणार्या या व्यक्तीवर आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगीतले. सहकारी निबंधकांनी या बँकेचे ऑडीट केले असुन त्यात त्यांना कुठलाही गैरव्यवहार आढळला नसल्याचे सांगीतले. ज्या वक्तीला बँकेने कर्ज दिले नसेल तीने चिडुन आपल्यावर आरोप केला असेल तर आपण न्यायालयात सगळी कागदपत्रे दाखवण्यास तयार असल्याचे फुंडकर यांनी सांगीतले.
Web Title- loan offered by creating fake certificates