नवी दिल्ली-कसोटी क्रिकेटमध्ये लोकेश राहुल ज्याप्रमाणे फलंदाजी करतो ते पाहता, तो भारताचा पुढचा सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर बनू शकतो असे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी लोकेश राहुलच्या फलंदाजांची स्तुती करतांना केले. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर सामना होणार आहे. त्यावर फारुख इंजिनीअर यांनी आपले मत मांडले आहे.
आतापर्यंत २४ कसोटी सामन्यांमध्ये लोकेश राहुलच्या नावावर १५१२ धावा जमा असून, यामध्ये ४ शतके तर ११ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली केलेल्या १९९ धावा ही लोकेश राहुलची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या आहे.