जळगाव: आज १७ व्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. जळगाव व रावेर मतदार संघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या आहेत, त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह जाणवत आहे. दुपारी उन्हाची तीव्रता पाहता मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडत आहे.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/girish-mahajan-2-464x348.jpg)
राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब मतदान केले.
जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर पाळणाघराची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी पालकांसोबत मतदान केंद्रावर आलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी खेळणी व खाऊची व्यवस्था करण्यात आली होती. येथे अंगणवाडी सेविका मुलांची काळजी घेताना दिसत आहेत. येथे सुरु असलेली चिमुकल्यांची धमाल मतदारांचा देखील उत्साह वाढवीत आहे.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/adavad-1-464x348.jpg)
चोपडा तालुक्यातील अडावद येथील मतदान केंद्रावर आदिवासी बांधवांनी मतदान केंद्रावर गर्दी केली.
राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील मतदान करण्यासाठी चक्क रिक्षात बसून आले. मंत्री रिक्षातून येत असल्याचे पाहून मतदार आवक झाले.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/aadarsh-matdan-464x348.jpg)
आदर्श मतदान केंद्रात मतदारांचे जल्लोषात स्वागत
सकाळपासून मतदान केंद्रावर महिलांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली आहे. फैजपूर शहरातील एका मतदान केंद्रावरील हे दृश्य आहे.
उमेदवार उन्मेष पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
जळगाव लोकसभेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आपली मूळ गावी दरेगाव ता. चाळीसगाव येथे सकाळी नऊ वाजता मतदान केले. सकाळी पाच वाजता त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून सूचना केल्या. संपूर्ण लोकसभा मतदार संघातून त्यांना सतत फोन सुरू होते. सहा वाजता ते घरा बाहेर पडले. दरेगाव कडे जाताना त्यांनी शहरातील अंध शाळा तसेच भोरस मार्गावरील कार्यकर्त्यांना भेटून माहिती घेतली . यावेळी त्यांचे वडील भैय्यासाहेब पाटील, त्यांच्या पत्नी संपदा पाटील व परिवारातील सदस्य उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी जनशक्ति शी बोलताना सांगितले की आज मी माझ्या मूळ गावी दरेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही मजबूत करणाऱ्या या मतदान प्रक्रियेत सर्वांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे सांगून ते म्हणाले की सर्वत्र मतदानासाठी प्रचंड उत्साह दिसून येतो आहे. मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या असल्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/unmesh-patil-2-522x348.jpg)
खडसे कुटुंबीयांनी सहकुटुंब केला मतदान
रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मतदान केले.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/ulhas-patil-522x348.jpg)
उल्हास पाटील आणि कुटुंबीय
रावेर लोकसभेसाठी महाघाडीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले.
सुरेशदादा जैन सपत्नीक
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सपत्नीक मतदान केले.
अशोक जैन
जळगाव शहरातील उद्योगपती अशोक जैन यांनी आज सकाळी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/ashok-jain-261x348.jpg)
मतदारांचे औक्षण
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव विधानसभा क्षेत्रातील नुतन मराठा महाविद्यालयातील सखी मतदान केंद्रावर मतदारांचे औक्षण करून स्वागत करताना सखी कर्मचारी.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/sahebrao-patil-696x321.jpg)
मतदान करून आल्यानंतर मतदानाचे आवाहन करताना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील , लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील