मुंबई: सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज झाले. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. यात महाराष्ट्रात सरासरी ५६.५७ टक्के मतदान झाल्याचे एएनआयकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवर मतदान झाले. पुणे, बारामती, सातारा, अहमदनगर, जळगाव, रावेर, सांगली, कोल्हापूर, हातकलंगणे, औरंगाबाद, जालना या ठिकाणी मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे, आता उत्सुकता निकालाची आहे. निकाल २३ मे रोजी लागणार आहे.