मतदानासाठी पुरविल्या जाणार सुविधा
जळगाव- निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत १०० टक्के सहभाग घ्यावा यासाठी त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहतूक सुविधा, व्हीलचेअर, मतदानासाठी ब्रेललिपीची सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात १४ हजार ९१८ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना या सुविधा दिल्या जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनादेखिल आता मतदान करणे सहज शक्य होणार आहे.
दि. २३ रोजी होणार्या मतदानापासून कुणीही वंचित राहु नये यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दिव्यांगाना सुविधा हव्या असतील तर त्यांना ऑनलाइन अर्ज जिल्हा निवडणूक शाखेकडे करण्यास सांगितले होते. त्यानुसार ४७३ दिव्यांगांना व्हिलचेअरची सुविधा दिली जाणार आहे. ३ हजार ११९ दिव्यांगांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार आहे. २ हजार ३६४ दिव्यांगाना ब्रेललिपी मतदानासाठी दिली जाणार आहे. ३ हजार ६१६ दिव्यांगाना मतदानासाठी मदतनीस पुरविले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मतदार संघानिहाय दिव्यांग मतदारांची संख्या
जळगाव लोकसभा मतदार संघ
जळगाव शहर–६५३
जळगाव ग्रामीण–१०४९
अमळनेर–२२१९
एरंडोल–१४१२
चाळीसगाव–२०९१
पाचोरा–९६९
रावेर लोकसभा
चोपडा–१७६९
रावेर–१०५२
भुसावळ–१६७७
जामनेर–८३१
मुक्ताईनगर–११९६
एकूण-१४ हजार ९१८