पुणे: राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात मुख्य लढत होती. या ठिकाणी पार्थ पवार ९९ हजार मतांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्थ पवार पराभवाच्या छायेत दिसत आहे. ९९ हजार मतांची आघाडी भरून काढणे पार्थ पवारला शक्य होणार नाही. पार्थ पवार पराभूत झाले तर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. पवार कुटुंबियांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.