‘मन की बात’ या बहुचर्चित कार्यक्रमाच्या 100 व्या कार्यक्रमाचे लोणारी मंगल कार्यालयात डिजिटल स्क्रीन वरती सार्वजनिकरित्या प्रसारित करण्यात आला
रविवार, ३० एप्रिल 2023 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या बहुचर्चित कार्यक्रमाच्या 100 व्या कार्यक्रमाचे आमदार संजयभाऊ सावकारे व सौ. रजनीताई सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेविका अनिता सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतिष सपकाळे यांनी लोणारी मंगल कार्यालयात डिजिटल स्क्रीन वरती सार्वजनिकरित्या प्रसारित करण्यात आला.कार्यक्रमाला माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे,अजय नागरणी, प्रमोद सावकारे,अनिताताई आंबेकर यांची उपस्थिती होती
मन की बात कार्यक्रम पार पडल्या नंतर आमदार संजयभाऊ सावकारे व रजनीताई सावकारे यांच्या नेतृत्वात अंजली जोशी,डॉ अर्चना राणे,सुषमा पाटील,पल्लवी पाटील,वंदना सोनार,रिता नाईक,मिनल पाटील,ज्योती येवले,अर्चना भगत,पल्लवी वारके, दीपा सपकाळे,सिंधू ठाकरे,मीना सोनवणे,शिल्पा रडे,पुष्पा सोनवणे,रुपाली वानखेडे,चित्रा सोनवणे,सीमा पाटील,ललिता पाटील,योगिता दुसाने यांच्यासह अनेक महिलांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
तसेच अमोल पाटील (विभागप्रमुख शिवसेना ठाकरे गट) यांच्यासह गिरीश राणे,महेश कोळी,अमोल झटकर,शिवम भोई,धनेश पाटील यांच्यासह अनेक बुथप्रमुख यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला
सोबतच नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. प्रथमच आयोजित केलेल्या या शिबिराचा भुसावळ शहरातील ४३५ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय सावकारे, सौ. रजनी सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे व पदाधिकाऱ्यांनी केले. डॉ.सुनील मेश्राम, डॉ. जिम्मी नागरणी, डॉ. जयपाल पवार आणि महालॅबचे सहकार्य लाभले.
श्रीरिदयम हॉस्पिटलतर्फे १४ नागरिकांचा ईसीजी मोफत
ब्राम्हण संघाजवळील श्री रिदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर हार्ट, ट्रामा आणि डायलिसिस सेंटरतर्फे रक्तातील साखर, रक्तदाब, ईसीजी तपासणी करण्यात आली. या दरम्यान १४ नागरिकांचा मोफत ईसीजी करण्यात आला. येणार आहे, तसेच या शिबिरात निदान झालेल्या रुग्णांना 2 डी इको आणि इंजिओग्राफीसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे .
३५ नागरिकांची डोळ्यांची शस्त्रक्रिया
शिबिरात हाडांतील कॅल्शिअमची तपासणी, दातांची तपासणी, रक्तातील पेशी, हिमोग्लोबिन, थायरॉईड, कावीळ, मलेरिया, लिव्हर आणि किडनीच्या विविध चाचण्या करण्यात आले. या मोफत शिबिरात मशीनीद्वारे डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३५ रुग्णांची डोळ्यांची शस्त्रक्रिया शासकीय योजने मार्फत मोफत करण्यात येणार असल्याचे आयोजक सतिष सपकाळे यांनी सांगितले.