नीरव मोदीला दणका; लंडन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला !

0

नवी दिल्ली: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. 24 मे रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. याआधी 29 मार्च रोजी लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला होता. मोदीला जामीन मिळू नये यासाठी या तपास यंत्रणांनी कोर्टात अत्यंत दमदारपणे आपली बाजू माडंली होती. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या संयुक्त पथकातील अधिकाऱ्यांनी अंगठा वर करुन विजयी मुद्रा दाखवत तसेच एकमेकांशी हस्तांदोलन करीत आनंद व्यक्त केला, असे एएनआयच्या लंडनमधील प्रतिनिधींनी म्हटले होते.