मला ‘त्या’ पत्रकार परिषदेचे निमंत्रण होते-कपिल सिब्बल

0

नवी दिल्ली-लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत इव्हीएम हॅकिंग संदर्भातला खुलासा झाला. सय्यद शुजा याच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल होते म्हणून ही पत्रकार परिषद काँग्रेसच्या सांगण्यावरून घेण्यात आली होती असा आरोप भाजपाने केला आहे. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी स्पष्टीकरण देत आपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो. मला या पत्रकार परिषदेत बोलवण्यात आले त्यामुळे मी गेलो होतो असे उत्तर दिले आहे.

कार्यक्रमाचे आयोजक आशिष रे यांना मी ओळखतो. त्यांनी मला इमेल करून या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. या प्रकरणाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हे प्रकरण निवडणुकांशी संबंधित आहे असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

सोमवारी लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत २०१४ च्या लोकसभा निवडणुका इव्हीएमद्वारे मॅनेज करण्यात आल्या होत्या. तसेच भाजपा, काँग्रेस, आपसह प्रमुख बारा पक्षांना इव्हीएम घोटाळा ठाऊक आहे असा आरोप करण्यात आला.