लखनौ: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहे. निवडणुकीत प्रचारासाठी वेगवेगळे फंडे आजमावले जात आहे. दरम्यान आज उत्तर प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री सपा नेते अखिलेश यादव यांच्या प्रचार रॅलीत चक्क योगी आदित्यनाथ दिसले. परंतु ते खरे-खुरे योगी नव्हते तर त्यांच्या सारखे दिसणारे योगी होते. त्यांचे नाव कैलास ठाकूर योद्धा असे आहे. त्यांनी आज अखिलेश यादव यांच्या प्रचारसभेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित मतदारांना मंचावरून हात दाखवत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.