नवी दिल्ली । रेल्वे प्रवासादरम्यान आरक्षित जागेसाठी अधिकृत ओळखीचा पुरावा म्हणून आता m-adharवापरता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आज यासाठी परवानगी दिली. आधार कार्ड मोबाईल अॅपच्या स्वरूपात वापरता येते यालाच m-adhar असे संबोधले जाते. m-adhar या मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती आपले आधार कार्ड डाऊनलोड करु शकते. आधार क्रमांकाशी जो मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला असेल त्याच मोबाईल क्रमांकावर हे अॅप वापरता येते. रेल्वे प्रवासादरम्यान, ओळखपत्राची मागणी करण्यात आल्यानंतर प्रवाशाला आपल्या मोबाईलमधील हे अॅप ओपन करून त्यामध्ये पासवर्ड टाकावा लागेल.