लंडन : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीनं हे ग्लोव्हज घातले होते. या ग्लोव्हजवरून मोठे वादंग उठले आहे. आयसीसीने धोनीला ग्लोव्हज काढण्याचे आदेश दिले. मात्र बीसीसीआयने धोनीची पाठ राखण करत ग्लोव्हजला पाठिंबा दिला. परंतु ‘बलिदान बॅज’चे चिन्ह असलेल्या ग्लोव्हजवर आक्षेप घेत आयसीसीने नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे असा आदेश दिला. त्यानुसार धोनीला पुढील ऑस्ट्रेलिया विरोध होणाऱ्या सामन्यांत ‘बलिदान बॅज’चे चिन्ह असलेले ग्लोव्हज घालता येणार नाही. धोनीने आयसीसीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असा पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयनेही आता एक पाऊल मागे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
धोनीला हे ग्लोव्हज घालण्याची परवानगी मिळावी याकरिता बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय परिषदेला पत्र पाठवले. धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हामुळे आयसीसीच्या कोणतेही नियम मोडले जात नसल्याचा बचाव बीसीसीआयने केला. पण, आयसीसीने शुक्रवारी बीसीसीआयची ही विनंती फेटाळली. धोनी चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता. नियमांचे उल्लंघन होणार असेल तर हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने स्पष्ट केले आहे.